औंध ,दि. १( punetoday9news):- पुरस्कार मिळाल्यामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हावे, असे मत नगरसेविका अर्चना मुसळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने संत रोहिदास रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती निमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संत रोहिदास पुरस्कार व गरीब गरजू मुलांना वह्या वाटप संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी नगरसेविका अर्चना मुसळे, मधुकर मुसळे, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव आगावणे, सुरेश गायकवाड, महिला सरचिटणीस रेखा चोंधे, सचिव बाळासाहेब कांबळे, संभाजी कांबळे बाबासाहेब कांबळे, बाळासाहेब भोसले, राम जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी निवृत्त शिक्षक चंद्रकांत सोनवणे, वकील सुरेखा थोरात, कोविड योध्दा सायली आगावणे, निवृत्त शिक्षक दत्तात्रय गेजगे, बालासाहेब माने, सुवर्णा कांबळे, महिला गटई कामगार यशोदा सूर्यवंशी, नितीन गायकवाड आदींचा यावेळी संत रोहिदास पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वैष्णवी पाटील, भुवनेश्वरी पांचाळ, अमृता गोरे, शुभम देवकुळे, आरती गायकवाड, आरती भंडारी, मुमताज हडागळी, श्रावणी थोरात, अश्विनी थोरात, काजल खडका, तेजस साळुंके या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार बलभीम भोसले यांनी मानले.
Comments are closed