पिंपरी, दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्मीधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनीच्या मैदान मासुळकर कॉलनी परिसरात आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सुमारे वीस टन कचरा संकलित करण्यात आला .
महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री . सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एच.ए. कंपनी मैदान परिसर पिंपरी व स्पाईन रोड चिखली प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले.
क प्रभागाच्या परिसरात आयोजित या स्वच्छता अभियानामध्ये आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ के अनिल रॉय ,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे,गणेश देशपांडे पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरातील एक हजार स्वयंसेवकानी सहभाग घेतला व परिसरात स्वच्छता केली
एच.ए. .कंपनी मैदानच्या 14 हजार चौ.मी.परिसर व बाजूच्या परिसरात सुमारे 20 टन सुका कचरा गोळा करण्यात आला.यावेळी प्रशासन अधिकारी मुकेश कोलप मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने,आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवा ल,शैलेश वाघमारे,विक्रम सौदाई व कर्मचारी सहभागी झाले होते.
Comments are closed