या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

दापोडी, दि. २( punetoday9news):- जनता शिक्षण संस्थेच्या, श्रीमती. सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच व्यवसायिक मार्गदर्शन विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास व्हावा. त्यांच्यामध्ये उद्योजकते विषयी प्रेरणा निर्माण व्हावी, स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन मिळावे. या उद्देशाने यशस्वी उद्योजक अंकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
” दे आसरा फाउंडेशन”चे डॉ. आनंद देशपांडे, सोनाली देशपांडे, रिया देशपांडे, एस. आर .जोशी, रवींद्र वंजारवाडकर, तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी योगेश रांगणेकर, (आकाशवाणी पुणे केंद्र वृत्तनिवेदक) यांच्या प्रयत्नातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यशस्वी ‘उद्योजक अंकात’ यशस्वी उद्योजकांचे त्यांच्या व्यवसायातील यशस्वीतेचे अनुभव, मांडण्यात आले असून यशस्वी उद्योग होण्यासाठीची प्रेरणा त्यातून निर्माण होणार आहे.

यशस्वी उद्योजक अंकामध्ये वस्त्रोद्योग, आरोग्य, पर्यटन, शेतीव्यवसाय जोडधंदे, बांधकाम व्यवसाय, फर्निचर व्यवसाय, आय,टी. उद्योग, शिक्षण, महिला उद्योग, इलेक्ट्रॉनिक उद्योग, इतर छोटे मोठे उद्योग, याविषयी यशस्वी उद्योजकांची माहिती देण्यात आली आहे.
या अंकांचे वाटप कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य, डॉ. सुभाष सूर्यवंशी व इतर प्राध्यापकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अंकाचे वाटप करण्यात आले.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग(N.S.S.), उद्योजकता विकास विभाग, व्यावसायिक मार्गदर्शन विभाग अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. डॉ. सोमनाथ दडस, प्रा. सुरेखा हरपुडे, प्रा. विनोद डी. ‌के., प्रा. अमरदीप गुरमे, प्रा .ज्योती लेकुळे, प्रा. उत्तम गोरड, प्रा. दिपाली खर्डे, लक्ष्मण कोहिनकर, लक्ष्मण मुरकुटे, हनुमंत गायकवाड, कपिल कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संयोजन उद्योजकता विकास विभाग, व्यवसाय मार्गदर्शनविभागाचे प्रमुख प्रा. सिद्धार्थ कांबळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. सोमनाथ दडस यांनी मानले.

 

 




 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!