या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन. 

पिंपरी,दि.२( punetoday9news):-
पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने ई श्रम कार्ड, डिजिटल हेल्थ कार्ड, युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड अशा नागरीकांना विविध उपयोगी कार्डचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

शामभाऊ जगताप यांनी राबविलेल्या या उपक्रमांबद्दल नागरीकांनी समधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विद्यमान नगरसेवक नवनाथ जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, विद्यमान नगरसेविका चंदाताई लोखंडे, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, माजी नगरसेवक राजू लोखंडे, अनुसूचित जमाती सेलचे शहराध्यक्ष विष्णू शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष उज्ज्वला ढोरे, पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29च्या अध्यक्षा तृप्तीताई जवळकर, अश्विनीताई शामभाऊ जगताप, सामाजिक कार्यकर्त्या मीरा ताई, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सतीश चोरमले, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवर, जावेद शेख, राष्ट्रवादीचे युवा नेते सागर परदेशी, युवा नेते पवन साळुंके, कामगार नेते हनुमंत जगताप, काँग्रेसचे नेते संदेश नवले, कामगार नेते मधुकर रणपिसे, सामाजिक कार्यकर्ते गणेश काशिद, गणेश काशिद, अतुल काशिद, गणेश जगताप, भाऊ जगताप, गणेश शिवाजी जगताप, बाळासाहेब सोनवणे, शंकर तात्या जगताप, कालिदास जगताप, कैलास जगताप, सोमनाथ जगताप, राघुजी जगताप, सौरभ जगताप, हनुमंत रामभाऊ जगताप, निखिल राजेंद्र जगताप, उमेश जगताप, अशोक रामभाऊ जगताप, जनार्दन जगताप, नरेश जगताप, रोहिदास जगताप, कमलेश जगताप, सुमित जगताप, सुदाम काशीद, संदीप नलावडे, नयन अहिरे, बलजित आदियाल, तसेच पिंपळे गुरवमधील ज्येष्ठ नागरिक, महिला व शामभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.

          यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले, की शामभाऊ जगताप यांच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल हेल्थ कार्ड, युनिव्हर्सल पास, ई श्रम कार्डचे मोठे फायदे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करीत आलेला पक्ष आहे. शामभाऊ समाजाशी एकरूप होऊन काम करीत आहेत. ते शरद पवार यांचा विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी विविध उपक्रम राबवित आले आहेत. समाजाला उपयोगी कामे त्यांनी केली आहेत.

भाजपच्या महापालिकेतील कारभारावरही अजित गव्हाणे यांनी टीका केली. ते म्हणाले, की भाजपमुळे देशात पिंपरी-चिंचवडची मान खाली गेली आहे. शास्ती कराचा प्रश्‍न जैसे थे आहे. अवघ्या नव्वद दिवसात शास्ती कर माफ करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, पाच वर्षाचा कालावधी संपला तरी यांना शास्ती कर माफ करता आला नाही. गुंठेवारी कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असून, या संदर्भात लवकर सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील.
संजोग वाघेरे म्हणाले, की सर्वसामान्य नागरीकांना हिताच्या ठरतील, अशा योजना शामभाऊ जगताप राबवित आहेत. ते करीत असलेले कार्य स्तुत्य आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्‍चितपणे भरारी घेईल.
नाना काटे म्हणाले, की शामभाऊ जगताप यांनी दिलेल्या डिजिटल सेवा सर्वसामान्यांना खूप फायदेशीर व महत्त्वाच्या आहेत. त्यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील सत्ताकाळातील कामेच भाजपचे लोकप्रतिनिधी आपली कामे म्हणून दाखवत आहेत. मुळात 2019 पर्यंत या वर्कऑर्डर होत्या. त्यामुळे गेल्या पाच वर्षात भाजपने काहीही विकासकामे केलेली नाहीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामभाऊ जगताप, तानाजीभाऊ जवळकर व अमरसिंग आदियाल यांनी केले. तर सूत्रसंचालन दत्ता कदम यांनी केले.




Comments are closed

error: Content is protected !!