या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

पुणे, दि. २( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती मधील जय मल्हार कृपा सोसायटीच्या ड्रेनेज चे काम करत असताना श्वास गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. 

सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करण्यासाठी तीन कामगार चेंबरच्या आतमध्ये उतरले होते .  त्यावेळी श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला . त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या चौथ्या कामगाराचाही यात मृत्यू झाला .

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस व अग्निशमन दलाचे पथक तिथे पोहोचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चारही मृतदेह चेंबरमधून बाहेर काढले . मृत कामगारांमध्ये सिकंदर पोपट कसबे , पद्माकर मारुती वाघमारे , कृष्णा दत्ता जाधव , रुपेश कांबळे यांचा समावेश आहे .




 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!