कंत्राटदारांनी कामगारांचे काढले दोन दोन अकाऊंट . बनवा बनवीचा प्रकार?

आवाज उठवणाऱ्या कामगारांना दाखवला घरचा रस्ता. 

बोगस कामगारांची नोंद करून बिले, पगार  वठवण्याचा कामगारांचा आरोप.

कामगारांसाठीच्या शासन नियमांची पायमल्ली करत साप्ताहिक सुट्टीही मिळत नाही.

आयुक्तांनी लक्ष देण्याची कामगारांची मागणी.

अधिकाऱ्यांपुढे खोटा पगार मिळत असल्याची माहिती देण्यासाठी दबाव.

 

पिंपरी,दि.५( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या विविध कार्यालय, हाॅस्पिटल, उद्यानामध्ये कामगार पुरवण्यासाठी कंत्राट घेणाऱ्या नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीच्या  ठेकेदारावर कामगारांनी गंभीर आरोप केले असुन त्याविरोधात थेरगाव येथील नवीन हाॅस्पिटल येथे निदर्शने केली. 

त्यानुसार या कामगारांची आर्थिक फसवणूक करत त्यांच्यावर अन्याय कारक निर्णय लादण्याचा ही त्यांनी आरोप केला आहे तसेच वरिष्ठांना चुकीची माहिती देत अनेक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप या कर्मचारी वर्गाने केला आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार कंपनीच्या ठेकेदारांनी बँकेत कामगारांचे दोन अकाऊंट उघडून एका अकाऊंटचे एटीएम कार्ड स्वतः कडे ठेवले असून पालिकेकडून येणारा पगार त्या खात्यात वठवण्यात येत आहे व नंतर तो कापून आम्हाला दुसऱ्या खात्यावर 10 ते 12 हजार रूपये इतकाच दिला जात आहे असे म्हटले आहे.

यातील काही कामगारांना कामावरून काढताना कसलेही ठोस कारण न सांगता व्हाट्सअपच्या माध्यमातून कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर काही कामगारांना कामावरून काढल्यानंतरही पगार मिळत नाही मात्र पीएफ जमा झाल्याचा मेसेज येतो म्हणजेच आमच्या अकाऊंटचा गैरवापर होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.

या प्रकरणात कामगारांनी लोक जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र सचिव प्रशांत खंडाळे यांच्या मार्फत आयुक्त व शासनाकडे  मे . नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस कडे दाद मागितली आहे मात्र त्यास प्रतिसाद न देता आम्हालाच धमकावले जात असल्याचे म्हटले आहे.

नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस एजन्सी आम्हाला शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन व इतर लाभ फायदे देत नाही . आम्हाला कमी पगार मिळतो . आठवडा सुट्टी मिळत नाही . सुट्टी मागितल्यास घरी बसविण्याची धमकी दिली जाते . पिंपरी चिंचवडसन २०१७ ते २०१९ या कालावधीतील किमान वेतन दरात झालेल्या वेतन फरकाची रक्कमही आम्हास ठेकेदारास दिली नाही . तसेच महिला कामगारांशी असभ्य वागणूक केली जात असून मानसिक छळ केला जातो असे कामगारांचे म्हणणे आहे.

 

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

Comments are closed

error: Content is protected !!