● छावा मराठा संघटनेची मागणी
सकाळी लवकर कामाला जाणारे लोक, आयटी कंपनीतील लोक घंटागाडी येण्याच्या वेळेला घरी नसतात. त्यामुळे महापालिकेने किमान अशा लोकांसाठी ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवावी. जेणेकरून कामावर जाताना किंवा कामावरून आल्यानंतर या लोकांना कचरा टाकण्याची सोय होईल. तसेच कचरा कुंड्यातील कचरा उचलण्यासाठी दिवसातून दोन वेळा कॉम्पॅक्टर आल्यास कचराकुंड्यातील कचरा अस्ताव्यस्त होणार नाही.
– रामभाऊ जाधव, छावा मराठा संघटना, पुणे जिल्हाप्रमुख
पिंपरी, दि.५( punetoday9news):-
पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंदौरच्या धर्तीवर कचराकुंडीमुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. मात्र, हे करताना शहर परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये काम करणार्यांना घंटागाडीच्या वेळेत पोहोचणे कठीण होऊन बसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. कुठेही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या कचर्यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. आता कचराकुंड्या उचलल्याने कचरा कुठेही अस्ताव्यस्त पडणार नाही. अशी महापालिकेची अपेक्षा होती. मात्र, आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे, नोकरदार यांना महापालिकेच्या घंटागाडीची वेळ गाठता येत नाही. त्यामुळे असे नागरीक सकाळी कामाला जाताना किंवा कामावरून आल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडतात. पण कचराकुंडीच नसल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी कचराकुंड्या काढून टाकल्या असल्या किंवा घंटागाड्या वेळेवर येऊनही रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला दिसणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगारांचे गंभीर आरोप
Comments are closed