प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून दिल्या शुभेच्छा
पुणे, दि. ६ ( punetoday9news):- पौड रोड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षार्थींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर बोर्ड परीक्षा होत असताना सर्व परीक्षार्थीचे परीक्षा सुरू होण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून थर्मल व ऑक्सिजन तपासण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्क वापर ही बंधनकारक करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या आवारात केंद्राच्या प्रवेशद्वारावर सर्व परीक्षार्थींचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.संजय भोईटे, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा.अरुण शिंदे, उपकेंद्र संचालक प्रा.अविनाश मदने, प्रा.एन.बी. मुल्ला, प्रा.हेमंत सावंत प्रा.सुरेश मोरे, प्रा.सुधाकर सुतार, गणेश साबळे ,दत्ता बेसके, सैंदाने, गुढेकर, विजय मारणे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी दोन वर्षानंतर प्रत्यक्ष लेखी परीक्षा देत आहेत. सर्वांनी परीक्षेबाबत सकारात्मक विचार, आत्मविश्वास व उपलब्ध वेळेचा सदूपयोग करून तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन प्राचार्य डॉ. झावरे यांनी केले.
मामासाहेब मोहोळ महाविद्यालय या उपकेंद्रावर एकूण ४०३ विद्यार्थी बारावी परीक्षेस प्रविष्ट झाल्याचे याप्रसंगी बोलताना उपकेंद्र संचालक प्रा.अविनाश मदने यांनी सांगितले.
नॅशनल सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीवर कामगारांचे गंभीर आरोप
Comments are closed