पुणे,दि. ७ ( punetoday9news):- शिक्षक परीक्षा घोटाळ्यात रोज नवीन धक्कादायक आकडे समोर येत आहेत. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 240 कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .
प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचेही तपासात समोर आले आहे . परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे . शिक्षक परीक्षा घोटाळ्या प्रकरणात आयएएस सुशील खोडवेकर याच्या अडचणीत वाढ झाली असून , त्याचा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे .
टीईटी परीक्षेत आर्थिक गैरव्यवहार करताना प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले . त्यातून तब्बल दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .
सात हजार 580 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले . एकूण तीन लाख 43 हजार 284 जणांनी परीक्षा दिली होती . या परीक्षेच्या अंतिम निकाल यादीत एकूण 16 हजार 705 जण पात्र ठरले , त्यांना टीईटी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत .
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगारांचे गंभीर आरोप
Comments are closed