सांगवी विकास मंचचा महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम.
पिंपरी, ८ ( punetoday9news):- जागतिक महिला दिनानिमित्त सांगवीतील सांगवी विकास मंचच्या वतीने विविध क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सांगवी व औंधला जोडणार्या मुळा नदीवरील पुलाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत म्हणजे तब्बल 380 फूट लांबीचा भव्य माहिती फलक लावण्यात आला होता. शालेय विद्यार्थी, नागरिकांमध्ये हा कौतुकाचा विषय ठरला.
सांगवी विकास मंच दरवर्षी अनोखा उपक्रम राबवित असते. यंदाही मंचातर्फे राजमाता जिजाऊपासून सध्या कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव वेगळ्या पद्धतीने केला. या उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, कल्पना चावला, पी.टी. उषा, किरण बेदी, लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, मेरी कॉम, संदीप कौर, शीतल महाजन, हिना सिंधु, राही सरनोबत, कर्णम मल्लेश्वरी, साक्षी मलिक, पी.व्ही. सिंधू, मिताली राज, सायना नेहवाल आदी विविध क्षेत्रात भरारी घेतलेल्या, भारताचे नाव जागतिक स्तरावर नेणार्या या महिलांची माहिती समाजाला व्हावी, या उद्देशाने हा भव्य माहितीफलक लावण्यात आल्याचे ओंकार भागवत यांनी सांगितले.
रस्त्याने जाणारे येणारे विद्यार्थी, नागरीक कौतुकाने या माहिती फलकाकडे पाहत या विविध क्षेत्रातील महिलांची माहिती आपल्या पाल्याला देत होते. तसेच महिलांच्या अशा अनोख्या गौरवाबद्दल सांगवी विकास मंचचे कौतुकही केले.
Comments are closed