पुणे, दि. ९ ( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने, प्राचार्या डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तृप्ती कोलते-पाटील तहसीलदार हवेली यांनी विद्यार्थ्यांना समाजात राहत असताना आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या याचे भान ठेवून आपण वागले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये ॲड.प्रफुल्ल पोतदार हायकोर्ट मेडिएटर, ज्येष्ठ विधिज्ञ पुणे बार असोसिएशन तसेच ॲड.सुरेखा वाडकर मा. विशाखा कमिटी सदस्य व जेष्ठ विधी तज्ञ बार असोसिएशन पुणे उपस्थित होते.
ॲड.प्रफुल्ल पोतदार यांनी विद्यार्थ्यांना महिला विषयक कायदे याबद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शना मध्ये प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांनी समाज माध्यमे आणि वापर, महिलाचे अधिकार आणि कर्तव्य व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. समाज माध्यमांचा वापर आपण फार काळजीपूर्वक केला पाहिजे व याच्या गैरवापरामुळे होणारे परिणाम व घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला,तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये ज्योत्स्ना गायकवाड,अंकिता गायकवाड,रोशनी गुरव.त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून स्त्रियांची विविध रूपे साकारली. यामध्ये गायत्री कोंढाळकर, ऋतिक जाधव, चंद्रकांत मस्के, अभय बेलेकर, खुशी मोरे, वैभवी भुजबळ, वंदिता भोसले यांनी सहभाग घेतला.
यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते पोस्टचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रा. दीपक पाटील प्रा. माधुरी सरवदे,ग्रंथपाल सनोबर काझी यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली मोरे व प्रा. संतोष सुतार यांनी आभार व्यक्त केले.
Comments are closed