पुणे, दि. ९( punetoday9news):- महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मामासाहेब मोहोळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग आणि महिला कक्ष यांच्या वतीने करण्यात आले.
यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले बाबुरावजी घोलप आणि मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापकांना संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नेमणूक केल्यामुळे प्रा.डॉ.सुनिता डाकले, प्रा.डॉ.प्रकाश हुंबड, प्रा.डॉ.निता कांबळे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यक्रम अधिकारी म्हणून सहभागासाठी प्रा.डॉ.भरत राठोड यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात समाजसेवक प्रा. नीलम पंडित आणि संदीप बर्वे यांचे ‘भारतीय संविधान निर्मितीतील महिलांचा सहभाग’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे आभार प्रा.डॉ.अशोक शेळके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या तृतीय सत्राचे प्रास्ताविक प्रा.डॉ.रूपाली शेंडकर यांनी केले. शाहू लक्ष्मी क्रीडा अकॅडमी च्या विद्यार्थिनींनी ‘स्त्री अत्याचार’ या विषयावर नृत्यातून जाणीवजागृती सादर केली. त्याच बरोबर संचालिका आरती मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसंरक्षणार्थ लाठी काठी प्रात्यक्षिक सादर केले आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींना लाठीकाठी चे प्रशिक्षण दिले. यामध्ये महिला प्राध्यापकांनी देखील आपला सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळकृष्ण झावरे यांनी विद्यार्थिनींना स्वयंसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि लाठीकाठी प्रशिक्षणाची गरज विचारात घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळकृष्ण झावरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अधीक्षक सीताराम अभंग, गोरख सोंडकर, श्याम भोसले उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. सपना राणे डॉ. आदिनाथ पाठक यांच्या हस्ते लाठीकाठी प्रात्यक्षिकातील विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.नीता कांबळे यांनी केले तसेच प्रा. मनीषा ठोनगीरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सपना राणे यांनी केले.
Comments are closed