जुनी सांगवी,दि. ९ ( punetoday9news ) :- जागतिक महिला दिनानिमित्त जुनी सांगवी येथील सांगवी विकास मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह कर्तबगार महिलांचे फोटो असलेला ३८० फुट लांबीचा शुभेच्छा फलक लक्षवेधून घेत आहे.
सांगवी विकास मंचाचे ओंकार भागवत व निलिमा भागवत यांच्या संकल्पनेतून जुनी सांगवी औंधला जोडणाऱ्या मुळा नदी पुलावर लावण्यात आलेल्या या फलकावर राजमाता जिजाऊ, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला,पी.टी.उषा,किरण बेदी, सिंधुताई सपकाळ,मेरी कॉम,संदीप कौर,शितल महाजन,हिना सिंधू, आदींचे फोटो असलेला शुभेच्छा फलक लक्षवेधून घेत आहे.
Loading ...
Comments are closed