देहू,दि. १०( punetoday9news):- अखिल भारतीय वारकरी मंडळ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा श्रीक्षेत्र देहूगांव येथे आयोजित करण्यात आला आहे.
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळा श्री क्षेत्र देहूगावं येथे दि.१३ मार्च ते २१ मार्च असा सात दिवस सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ७ ते ९ हरिकीर्तन, रात्री १०:३० ते १२:३० संगीत भजन व मध्यरात्री हरिजागर असा सप्ताहाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून ज्ञानपीठाधिपती हभप प्रकाश बोधले महाराज हे असून भारतीय वारकरी मंडळ संचलित, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज ज्ञानपीठ अंतर्गत वारकरी संगित विभाग उद्घाटन सोहळा वारकरी संगित विभाग प्रमुख संगितकार गायक पंडीत कल्याण गुरूजी गायकवाड यांचे हस्ते शनिवार दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती मंगल कार्यालय, गाथा मंदिर रोड देहूगावं येथे होणार आहे. असे कार्यक्रमाचे संयोजक ( पुणे जिल्हा अध्यक्ष अ.भा.वा. मंडळ)
ह.भ.प.सुखदेव महाराज ठाकर, हभप संतोष महाराज काळोखे ( हवेली तालुका अध्यक्ष, अ.भा.वा. मंडळ ) तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे जिल्हा कमिटी पदाधिकारी केंद्रिय, राज्य, विभागीय, शहर, जिल्हा, तालुका, कॅन्टोमेंन्ट कमिटी अध्यक्ष, सहअध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव कोषाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी कळविले आहे.
Comments are closed