पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणीस यांची माहिती
मुंबई, दि. १२ ( punetoday9news):- राज्यातील महाघोटाळा बाहेर काढल्याने कारवाईचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.
ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली असून सायबर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे त्यानुसार फडणवीस उद्या अकरा वाजता माहिती देण्यासाठी चौकशीला सामोरे जाणार आहेत. या प्रकरणात मला प्रश्नावली पाठवण्यात आली मात्र माझ्याकडे आलेली माहिती देणे ही बाब विरोधी पक्षनेता म्हणून मला बंधनकारक नाही. योग्य वेळी मी ती माहिती सभागृहात मांडली आहे. पेन ड्राइव मधील डाटा चे फॉरेन्सिक ऑडिट झालेले आहे. पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Comments are closed