पुणे, दि. १३( punetoday9news):-  पंजाब सरकारने त्यांच्या राज्यातील माजी मंत्री व माजी आमदार यांना मिळणारी सरकारी सुरक्षा काढण्याच्या निर्णय घेतला असून त्याचे स्वागत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

ट्विट करत त्यांनी याबाबत राज्यातही महाराष्ट्र राज्यातही असे करता येईल का असे सूचक विधान केले आहे यामध्ये ते म्हणाले की, “माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळं पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा!”

तसेच या ट्विटला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना टॅग केल्याने यातून असे स्पष्ट होते की रोहित पवार यांना असे तर सांगायचे नाही ना? की महाराष्ट्र राज्यातही अशा पद्धतीने माजी मंत्री व खासदार यांच्यासाठी खर्च होणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा भार कमी करून तो राज्याच्या इतर कामकाजासाठी वळवावा.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगारांचे गंभीर आरोप 

 

फडणीस यांना नोटीस. 




या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

 

Comments are closed

error: Content is protected !!