पुणे, १३( punetoday9news):- महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेच्या कार्यकारी विश्वस्तपदी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. मलघे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी डॉ. मलघे यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले, की डॉ. मलघे यांचे महाविद्यालयातील प्राचार्य म्हणून असलेले काम उत्तम आहे. तसेच त्यांनी साहित्यक्षेत्रात कथा, कविता, ललित, समीक्षा, बालसाहित्य अशा साहित्य प्रकारात लेखन केले आहे. त्यामुळे या संस्थेवर करण्यात आलेली त्यांची निवड सार्थ आहे. त्यांच्याकडून उत्तम काम होईल, हीच अपेक्षा आहे.
साहित्य कला प्रसारिणी संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी डॉ. मलघे यांचे अभिनंदन केले. तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, तसेच मावळातील नागरिकांकडून डॉ. मलघे यांचे अभिनंदन होत आहे.
Comments are closed