रहाटणी,दि. १३( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रहाटणी येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला साजेसा असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. महापौर उषा उर्फ माई ढोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, नगरसदस्य नाना काटे, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या झामाबाई बारणे, सुनिता तापकीर, शितल काटे, निर्मला कुटे, स्वीकृत सदस्य अड. मोरेश्वर शेडगे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पंचधातु मधील पुतळा आहे.अश्वारूढपुतळ्याची जिरेटोपापर्यंत उंची २१ फूट असून तलवारीची टोकाची उंची २८ फूट इतकी आहे. या पुतळ्याचे वजन ६ टन असून घोड्याच्या मागील दोन पायावर उभा राहणारा हा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस उंच दगडी कमान भिंत आहे. या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये दोन कोटी 20 लाख रुपये इतका खर्च आलेला आहे. या पुतळ्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक प्रसंगाचे म्यूरल्स बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवर यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे यांनी केले
नगरसदस्य चंद्रकांत नखाते यांनी आभार मानले.
Comments are closed