● जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिना निमित्त सन्मान 

● राजमाता जिजाऊ – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार 2022.

● राजमाता जिजाऊ- क्रांतीज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार 2022.

● प्रा. संतोष थोरात व डॉ. संदिप गाडेकर लिखित खालील इंग्रजी व्याकरण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा.

● राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2021-शैक्षणिक परिसंवाद

पुणे, दि. १४ ( punetoday9news):- जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिना निमित्त शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) च्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2021 वर परिसंवाद आयोजित करण्यात आला.

यावेळी स्वाती भावे (उपाध्यक्षा,प.महा.भारतीय शिक्षण मंडळ) , डॉ श्रीपाल सबनीस (अध्यक्ष 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), डॉ. उमेश प्रधान (बालभारती पुणे), माजी महापौर वैशाली बनकर, कमल व्यवहारे, सुनंदा वाखारे, विजय बहाळकर, प्राचार्य हणमंतराव भोसले, जी. के. थोरात, हरिश्चंद्र गायकवाड, ए.जी. थोरात, राजेंद्र बरकडे,प्राचार्य शिवाजीराव कामथे, प्रा सचिन दुर्गाडे. प्रा. जितेंद्र देवकर. प्रा.संतोष थोरात, डॉ. उज्ज्वला हातागळे,  माधवी पांढरकर, स्वाती लिम्हण, अशोक धालगडे. मा. प्राचार्य अविनाश ताकवले, प्राचार्य संजीव यादव एस. डी. जमाले, के. एस. ढोमसे, वसंतराव ताकवले, प्रशांत आबने  व पदाधिकारी  उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले, ” समाजाच्या निर्मितीमध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे त्याचबरोबर एक आदर्श समाज घडवताना शिक्षकांमध्ये ही आदर्शवादी गुण असणे आवश्यक आहे. महिला सन्मान होणं ही अभिमानाची बाब आहे . महिला एक स्त्री  , माता ,भगिनी या भुमिकेत समाज घडवत असते. सावित्रीबाई फुले या महात्म्यांच्या महात्मा तर जिजामाता दातृत्वाच्या आदर्श मुर्ती आहेत.  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना कुठल्याही झेंड्याखाली न जाता जातीपातींना मूठमाती देत अध्यापन करावयास हवे.  विज्ञान विवेकी असावे. आज संपूर्ण जग आपलेच घर असून सीमावाद प्रांतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. असे सांगितले. “

प्रधान यांनी शालेय जीवनात भाषेचे महत्त्व अधोरेखित करत विविध उदाहरणे दिली. ते म्हणाले सर्व विषय शिकवण्यासाठी भाषेची गरज असते.  व्याकरणा शिवाय भाषा अपूर्ण आहे. 

जी के थोरात यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की पुणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात आज 66% महिला कार्यरत आहेत. त्यामुळे महिलां सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा.  आपल्या टीडीएफ संघटनेला मजबूती देण्याच्या दृष्टीने पावले उचलावी. आपल्या संघटनेत मोठी ताकत आहे व संघटनेचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या संघटनेच्या माध्यमातून महिलांना सन्मानित करणे ही अभिमानाची बाब आहे. 

यावेळी राजमाता जिजाऊ – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कार  सुनंदा वाखारे शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जि.प.पुणे, किरण तावरे, (सचिव, श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्था,पुणे.), डॉ. मेघा उपलाने (विभाग प्रमुख, शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे.), सविता बरकडे ( सचिव, शिवशक्ती धर्मा. संस्था पुरंदर पुणे.), शिल्पा चाबुकस्वार , (क्रिडा अधिकारी, डीएसओ कार्यालय पुणे.), शैलजा शिंदे – झणझणे.(पोलीस उपनिरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे.)

तर

राजमाता जिजाऊ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार पुणे शहरातील विविध विभागातील 25 शिक्षिका भगिनींना देण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), प्राथमिक ,माध्यमिक , उच्च माध्यमिक शिक्षक संघ , पुणे शहर विनाअनुदानित शिक्षक संघ सर्व पदाधिकारी यांनी केले.

 


 

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!