पुणे, दि. १५( punetoday9news):- शाळेत दहावीचा निरोप समारंभ सुरु असताना आरोपी तीक्ष्ण शस्त्रासह वर्गात घुसला आणि विद्यार्थिनीवर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली.
पुण्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं समोर आलं आहेत.
शाळेत घुसून वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षिकेसमोर हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ होता, त्याच वेळी आरोपीने हल्ला केला.
वडगाव शेरीमधल्या एका शाळेत संबंधित मुलगी दहावीच्या वर्गात शिकते. लवकरच दहावीच्या परीक्षा ऑफलाईन सुरु होणार आहेत. त्याआधी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रम सुरु असताना आरोपी तीक्ष्ण शस्त्रासह वर्गात घुसला आणि विद्यार्थिनीवर सपासप वार केले. विद्यार्थिनीवर उपचारांसाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हल्ल्यात मुलीच्या पोटाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. आरोपी धारदार शस्त्र घेऊन थेट वर्गात घुसला आणि त्याने विद्यार्थिनीवर हल्ला केला. त्यामुळे या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट पसरली.
हल्ला करणारा आरोपी हा मुलीच्या परिचयातील असल्याच कळते. मुलीवर वार केल्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेनंतर येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत
Comments are closed