सांगवी, दि. १५( punetoday9news):- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा आरती राव आणि सचिव प्रणव राव यांच्या हस्ते गुलाबपुष्प व पेन देऊन उत्साहात स्वागत करीत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे व शिक्षकवृंद उपस्थित होते.


संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. घाबरून न जाता किंवा घाई न करता मन शांत ठेवून पेपर लिहा. दहावी म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणाचा मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आवाहन केले, की मनात परीक्षेची भीती न बाळगता पेपर द्या. गोंधळून न जाता दिलेल्या सूचनांचे पालन करून परीक्षेला सामोरे गेल्यास यश आपलेच आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!