पुणे, दि. १६ ( punetoday9news):- पुणे महानगरपालिकेचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने महापालिकेत प्रशासकाची नेमणूक झाली आहे . नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक सक्रिय झाले आहेत . शहरात नगरसेवकांच्या आश्रयामुळे ठिकठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास प्रशासनाने आता सुरुवात केली आहे .

रस्ते , पदापथावर, पसरलेली अतिक्रमण काढण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत . अतिक्रमण काढण्याबरोबरच महानगरपालिका येत्या काळात शहरात वाढलेल्या अनधिकृत बांधकामावरही हातोडा चालवणार आहे . शहर अतिक्रमणमुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेली अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेशही देण्यात आले आहे . अन्यथा तोडण्याचा इशारा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिला आहे.

शहरातील राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ठीकठिकाणी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे जोमात वाढलेली दिसत आहेत . मात्र याचा नाहक त्रास सर्वसामान्य व पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे . त्यामुळे अतिक्रमणे करून रस्ते अडविणाऱ्यांवर आता दररोज कारवाई होणार आहे . प्रशासन वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांसह , पदपथ आणि मोकळ्या जागांवर दुकान मांडणाऱ्यांवर कारवाई करणार आहे . यात अनधिकृत बांधकामांचाही समावेश आहे . प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास आठवड्यातील दोन दिवस निश्चित करून देण्यात आले आहेत . अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे . या कारवाईबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!