पुणे, दि. १७ ( punetoday9news):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय “मूल्य शिक्षण कार्यशाळा अंतर्गत श्रमदानातून व्यक्तिमत्व विकास” राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठस्तरीय शिबिराचे आयोजन मु.पो. होतले, ता.मुळशी ,जि. पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे .सदर शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव मा. एल. एम. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपले मनोतात ” स्वालंबन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांची महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले .
या सात दिवसीय विद्यापीठस्तरीय शिबिरामध्ये पुणे, नगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातून १६३ स्वयंसेवकांचा सहभाग आहे.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले “जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून तेथील संस्कृती,रुडी,संस्कार व खेड्या मधील चालीरीती व जीवन समजून व उमजून घेतल्या पाहिजेत. तसेच समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे असे विचार व्यक्त केले”.
या कार्यक्रमामध्ये गावा च्या सरपंच धनश्री नवनाथ पालकर उप.सरपंच पौर्णिमा सचिन जोरी,ग्रामसेवक गजानन खंडू जाधव, शाळा व्यवस्थापन समिती पुंडलिक दुर्गे हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे उप.प्राचार्य डॉ.एस.बी.शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.भरत राठोड ,डॉ.नीता कांबळे ,डॉ.महादू बागुल डॅा. अशोक शेळके ,प्रा. निता देशमुख ,डॉ. मेघना भोसले तसेच शिक्षक व सेवकवर्ग आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed