● अनधिकृत पार्किंग, पदपथ अतिक्रमणाने त्रस्त नागरिकांकडून या आदेशाचे स्वागत.

 

पिंपरी, दि.१८ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे अथवा अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणावर महाराष्ट्र महानगरपालिका अतिक्रमण पथक व धडक पथकाने कारवाई करावी, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्र आदेश दिला असून पिंपरी चिंचवड शहरातील पदपथ व सायकल ट्रॅक नागरिकांना वापर करणेकरीता उपलब्ध करून देणेबाबत महानगरपालिकेची जबाबदारी आहे. तथापि शहरातील बहुतांश पदपथ व सायकल ट्रॅकवर नागरिक अनाधिकृतपणे, अतिक्रमण करून वाहने पार्क करीत असल्याने नागरिकांना पदपथावर चालतांना व सायकल ट्रॅकवर सायकल चालवतांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पदपथावर व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे,अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे व अतिक्रमण निष्काशीत करणे आवश्यक आहे.
सार्वजनिक रस्त्यांच्या किंवा विशिष्ट सार्वजनिक रस्त्यांच्या बाबतीत अशा रस्त्याच्या बाजूस किंवा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना धोका पोहोचण्याचा किंवा अडथळा होण्याचा संभव आहे असे वाटेल अशा सर्व वाहनांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सर्व रस्त्यावरील पदपथ, पादचारी मार्गावर पादचाऱ्यांना अडथळा होणाऱ्या सर्व प्रकारचे अतिक्रमण वाहने इ. वर कारवाई करून जप्त करणे व त्यावर दंडात्मक रक्कम वसुली करणेबाबतचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षकांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील धडक पथकामार्फत कारवाई करुन आपल्या अधिनस्त क्षेत्रातील सर्व पदपथ,पादचारी मार्ग लोकांना चालण्यास सुरक्षित व सुस्थितीत रिकामे राहतील याची दक्षता घ्यावी आणि ज्या ठिकाणी पदपथावर वाहने पार्क केली असतील किंवा अतिक्रमण असेल त्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयाकडे सह शहर अभियंता (अतिक्रमण) यांचेमार्फत द्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 




#

Comments are closed

error: Content is protected !!