‘गुड टच, बॅड टच’
मुळे समोर आला प्रकार.
पुणे, दि. २०( punetoday9news):- पुण्यात 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि सख्खा मामाने अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे.
कोरेगाव पार्क मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही मुलगी शिकत आहे. याच शाळेत समुपदेशन सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत असताना, मुलींना त्या ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत होत्या.
त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या ४ वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्या वेळी हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानुसार या प्रकरणी पीडितेच्या भावाला अटक करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments are closed