पुणे, दि. २२( punetoday9news):- पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुढे नेण्यासाठी पुणे महानगरपालिकेसह पर्यावरण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा मानस यानिमित्ताने करण्यात आला आहे.
शहरातील सोसायट्या व त्यांच्या परिसरातील घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प, सोसायटी विमा, स्वच्छता, गृह संस्थांना कायदेशीर सल्ला तसेच प्रशासकीय यंत्रणांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत माय अर्थ फांउडेशन, महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा), पुणे जिल्हा सहकारी गृहसंस्था फेडरेशन आणि एन्वायारन्मेंट क्लब ऑफ इंडिया च्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे २४ मार्च रोजी दुपारी १ ते ५ यावेळेत प्रदर्शन व ३ ते ५ या वेळेत मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे.
पुणे शहरातील सर्व गृहसंस्थाच्या सभासदांनी, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी या उपक्रमाला उपस्थिती नोंदवावी असे आवाहन पुणे मनपा आणि सर्व सहभागी संस्थांनी केले आहे.
Comments are closed