दापोडी, दि. २३ ( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शहीद दिनाच्या निमित्ताने अनाथ आश्रमात पुस्तके व खाऊवाटप करण्यात आला.
यावेळी ३ महाराष्ट्र आर्मड् एनसीसी पुणे चे कमांडींग ऑफिसर Lt Col प्रदिप कदम, Jco राज सिंग, GCI नितू मॅडम, कॅप्टन किशोर पाटील व पी आय स्टाफ , दापोडी , प्राचार्य अंजली घोडके “सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम ” संस्थेचे अध्यक्ष देविदास सुरवसे, पौर्णिमा कांबळे, महादेव गायकवाड, छबुबाई सुरवसे, धम्मप्रकाश सुरवसे, अधीक्षक विश्वनाथ साठे, NCC सिनियर डिव्हीजन कॅडेट उपस्थित होते.
यावेळी अनाथ आश्रमातील मुलांना देशप्रेम व देशभक्ती या विषयावर माहिती देण्यात आली. तसेच पुस्तके व चॉकलेट चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदीर व डी. टी. पाटील कनिष्ठ महाविदयालयाचे एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमास प्राचार्या अंजली घोडके यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
Comments are closed