पुणे, दि. २५( punetoday9news):-  शिवजयंतीचे औचित्य साधून साह्यकडाच्या २३ गिर्यारोहकांनी मुरबाड तालुक्यातील सिद्धगडाला लागुन असलेला सिद्धाची लिंगी सुळका सर करून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली.

हा सुळका सर करताना त्यांना पाच विविध टप्प्यांमध्ये चढाईचे नियोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा जयघोष करत सुळक्याच्या माथ्यावर तिरंगा व भगवा फडकविण्यात आला.

या मोहिमेत पवनकुमार शिवले, शैलेश मेमाणे, श्रुतिका खांदवे, गौरी खांदवे, सुयोग चौखंडे, स्पंदन टकले, अखिल जाधव, किरण दौंडकर, ॠतुजा चौधरी, सागर मांडेकर, वैभव फापाळे, ऋषिकेश शिवले, रविंद्र मोहिते, तात्यासो थोरात, प्रणव थोरात, निखिल पोखरकर, प्रणव हरगुडे, यशवंत शिवले, ईश्वर संभेराव, संतोष देशमुख यांचा समावेश होता.

या मोहिमेचे नेतृत्व साह्यकडा एडवेंचरचे अध्यक्ष बाबाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!