पुणे, दि. २७( punetoday9news):-   पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ पौडरोड महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सौमिल कोवाडकर विद्यार्थ्याने उदयपूर इथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत S14 विभागात ३ सुवर्ण पदक मिळवली.

ही वार्षिक स्पर्धा Paralympic Committe of India तर्फे आयोजित केली जाते. S1 ते S14 अशा वेगवेगळ्या ग्रुप मधून 23 राज्यातील, Sub junior, Junior आणि Men (Senior) तसेच Women मिळून 400 हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता .

सौमिल ने महाराष्ट्रातर्फे 200 फ्री स्टाईल, 200 individual medley आणि 100 बॅक, या तीन इव्हेंट मध्ये भाग घेतला. आतापर्यंत सौमिल ने आंतरराष्ट्रीय स्तरावर २, राष्ट्रीय पातळीवर ८ व राज्य पातळीवर अनेक पदकं मिळवलेली आहेत. त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार,
उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप कदम ,खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम. जाधव व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नियामक मंडळाचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी अभिनंदन केले.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!