भोसरी, दि. २७( punetoday9news):- भोसरी येथील नारायण हट सहकारी गृह संस्थेच्या वतीने शाळा परिसरात स्वच्छता उपक्रम राबवत श्रमदान करण्यात आले.
” माझी सोसायटी माझी जबाबदारी !” तसेच “माझी शाळा माझे कर्तव्य!” या भूमिकेतून भोसरी येथील नारायण हट सहकारी गृह संस्थेअंतर्गत शिशुवर्ग शाळा प्रांगणात श्रमदान करण्यात आले. या उपक्रमात सोसायटीमधील बहुसंख्य सभासद सह-कुटुंब सहभागी झाले होते.
स्वच्छता व श्रमदान कार्यक्रमात ज्ञानेश्वर सावंत, संदीप बेंडुरे, मुकुंद आवटे, शिवराम काळे, संजय सांगळे, रोहिदास गैंद, उज्वला थिटे, रोहिणी पवार, अंकुश गोरडे, प्रा. डॉ. वसंतराव गावडे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, यशवंतराव नेहरे, रामदास गाढवे, शंकर पवार, सचिन बो-हाडे, अमोल मुळुक, बाळासाहेब मुळूक, तनिष अल्हाट, अनिता सांगळे, वैशाली गावडे यांनी सहभाग नोंदवला.
Comments are closed