पुणे,  ( punetoday9news):-  सुसंस्कृत पिढी घडविण्यात शिक्षकांबरोबरच पालकांचेही योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी केले.

(फोटो:- पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन  करताना प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे.)

पौड रोड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. झावरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त, अभ्यास व आरोग्य या त्रिसूत्रीकडे पालक व शिक्षकांनी आवर्जून लक्ष देणे गरजेचे असल्याचेही सांगितले. प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या सभेस अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते. वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा पालकांपुढे सादर केला तर गुणवत्ता वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न याविषयीही माहिती दिली. याप्रसंगी बोलताना विभाग प्रमुख प्रा. संजय भोईटे यांनी विद्यार्थ्यांच्या मानसीक, शारीरिक व बौद्धिक विकास संवर्धनाविषयी तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात प्रा. एस.एम.शिंदे प्रा. जी.एस.बांडनारू व प्रा. एम.आर.ठोगिंरे या शिक्षकांनी तसेच गुप्ता, वाघ व परदेशी आदी पालकांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.व्ही.भोईटे यांनी केले. प्रा. व्ही.ए. कदम यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. एस.डी. शिंदे यांनी आभार मानले.

 

Comments are closed

error: Content is protected !!