पुणे, दि. ३०( punetoday9news):- औध येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेची एक हजार शाळांमधून जर्मनीतील दुतावासाशी व्हिडीओ कॉन्फररन्सद्वारे संवाद साधण्यासाठी निवड झाली.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जर्मनीतील भारतीय वाणिज्य दुतावास डॉ. सुयश चव्हाण यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाच्या संधीची योग्य माहिती मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या कार्यशाळेत जर्मनीतील शैक्षणिक आणि करियरविषयक संधीबाबत माहिती देण्यात आली .
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसोबत प्रशालेतील शिक्षिका सुषमा असवले प्राचार्य राजू दीक्षित, उप्राचार्य पोपटराव ताकवले आणि पर्यवेक्षिका भारती पवार उपस्थित होते.
Comments are closed