कोथरुड,दि. १( punetoday9news):- पुणे शहरातील कोथरुड परिसरात १६ वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या घरी शिकवणी साठी येणाऱ्या शिक्षिकेचे बाथरूम मध्ये मोबाईल लपवून चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  हा मुलगा सध्या दहावीत शिकत असून त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मागील पाच वर्षांपासून इंग्रजी विषयाची खाजगी शिकवणी लावली होती .

ही शिक्षिका कोथरुडमधील त्याच्या घरी त्याला शिकवायला जात होती . शिक्षिका त्याच्या घरातील बाथरुमचा वापर करण्यासाठी गेली असता आतमधील साबणाच्या खोक्याच्या मागे मोबाईल असल्याचे शिक्षिकेला दिसले . तो पाहिला असता त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याची धक्कादायक गंभीर बाब या शिक्षिकेच्या लक्षात आली.  तसेच यापूर्वीही ज्यावेळी शिक्षिका बाथरुममध्ये गेली त्यावेळचेही चित्रीकरण केलेले आढळून आले . त्याचबरोबर इतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आढळून आले .

याबाबत पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली असून  त्यानंतर पोलीसांनी आय टी एक्ट नुसार या मुलाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे . या विभागाच्या मुलाला बालकल्याण अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहेत आहे .

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!