सासवड, दि. २( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या बालसिध्दनाथ विद्यालयात ‘रयत माऊली’ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवत प्रशालेच्या महिला शिक्षिका सरिता जगताप, धनश्री कदम यांच्या हस्ते लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर इ. ९वी मधील विद्यार्थिनी तमन्ना मुजावर हिने रयतमाऊलीं बद्दल आपले कृतज्ञतापूर्ण विचार व्यक्त केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक सतिश रासकर यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून लक्ष्मीबाई पाटील यांच्या जीवनातील अनेक प्रसंग भाषणातून विद्यार्थ्यांपुढे जिवंत उभे केले.
कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक योगेश घोडके, मारूती गंभिरे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भोसले यांनी केले तर आभार जेष्ठ शिक्षक रविंद्र निगडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सतिश रासकर यांच्या तर्फे सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर सेवकांना खाऊचे वाटप करण्यात आले.
Comments are closed