सांगवी, दि. ६ ( punetoday9news):-  पिंपळे गुरव येथील ओमसाई फाऊंडेशन तर्फे सांगवी पोलीस स्टेशनला माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मण जगताप व उद्योजक माऊली जगताप यांच्या मार्गदर्शना खाली अग्निशामक सिलेंडर देण्यात आले.

त्यावेळी ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की बऱ्याच शासकीय कार्यालयात शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे प्रकार घडले आहेत. नागरिक व शासनाचे या प्रकारात मोठे नुकसान झाले आहे.  असे अनुचित प्रकार सांगवी  पोलीस ठाण्यात होऊ नये म्हणून आम्ही सांगवी पोलीस स्टेशनला हे अग्नी शामक सिलेंडर देत आहोत.

या प्रसंगी सांगवी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे म्हणाले की “पोलिस स्टेशनमध्ये अग्नी रोधक उपकरणाची आवश्यकता होती तसेच फाउंडेशनतर्फे या विषयावर प्रशिक्षणही द्यावे. ओम साई फाऊंडेशनने केलेल्या चांगल्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो.”

या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलिस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे, हवालदार नलिनी गायकवाड, रमेश चौधरी, हवालदार रेखा साबळे, राजू अवळेकर,
रवी खोकर, शैलेश थोरात उपस्थित होते.

 

 




Comments are closed

error: Content is protected !!