सांगवी, दि. ७ ( punetoday9news):-  विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न, प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समिती – सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कँप, या संयुक्त जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

बुधवार ता.६ रोजी १२५ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीची नियोजन बैठक येथील बुद्धघोष हाऊसिंग सोसायटी बुद्धविहार येथे संपन्न झाली.
या बैठकीत सर्वानुमते विजय गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

या प्रसंगी जी.आर.कांबळे, पी.आर गायकवाड, रवि कांबळे, विलास कांबळे, अ‍ॅड.राजेंश नितनवरे, अमर आदीयाल, प्रकाश ओहाळ विजय चौधरी विकास साळवी, धनंजय कांबळे,प्रितम शिंदे, गणेश जगताप,राहुल काकडे,
गजानन कांबळे,कैलाश बनसोडे,पंकज कांबळे आदी उपस्थित होते.


 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!