सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांमध्ये जावून चर्चेची तयारी दाखवली तरीही आंदोलकांनी चर्चेऐवजी आक्रोश केल्याने अनेक प्रश्न उपस्थित.

आंदोलन भडकावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार  – गृहमंत्री दीलिप वळसे पाटील .

अशाप्रकारे आंदोलन व्यक्तीगत पातळीवर नेणं अयोग्य- जितेंद्र आव्हाड. 

 

मुंबई, दि. ८ ( punetoday9news):- राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल कोर्टाच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा केला असताना आज अनानक आक्रमक भूमिका घेत चप्पल, दगडफेक करत सिल्वर ओक या शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढला. 

यावेळी अचानक झालेल्या आंदोलनाची माहिती मुंबई पोलिसांना नसल्याने आंदोलक थेट शरद पवार यांच्या निवासस्थाना पर्यंत गेल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीतही सुप्रिया सुळे स्वतः चर्चेस तयार आहोत असे हात जोडून आंदोलकांपर्यत गेल्या मात्र तरीही आंदोलक चर्चेऐवजी आक्रोश व्यक्त करत होते.  त्यामुळे या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच या आंदोलना दरम्यान दिल्या जाणाऱ्या घोषणा या फक्त मागणीच्या नसून आक्रोश व्यक्त करणाऱ्या होत्या. प्रसार माध्यमांनीही काही आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना या आंदोलनाचा उद्देश सांगता आला नाही.

यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले व आंदोलकांशी शांततेच्या मार्गाने  चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.

तर जितेंद्र आव्हाड म्हणाले की व्यक्तिगत पातळीवर जावून घरात घुसून आंदोलन करणे ही निंदनीय बाब आहे.

 

राज्याचे गृहमंत्री दीलिप वळसे पाटील यांनी या घटनेची सर्व माहिती आयुक्तांकडून मागवली आहे तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

जयंत पाटील म्हणाले.

 

त्यामुळे ह्या आंदोलनामागील खरा सूत्रधार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


 




Comments are closed

error: Content is protected !!