गुगलने प्ले स्टोअरवरून व्हायरस पसरवत माहिती चोरणारे  सहा ॲप काढून टाकण्यात आले आहेत . हे ॲप्स युजर्सच्या फोनमध्ये व्हायरस पसरवत होते . तसेच सर्व ॲप्समध्ये शार्कबॉट बँक स्टीलर मालवेअर देखील होते जे युजर्सची बँक आणि अकाऊंट संबंधित माहिती चोरत होते.

गूगलने काढून टाकलेल्या ॲप्सची नावे.

1. ॲटम क्लीन – बूस्टर अँटीव्हायरस ( Atom Clean – booster Antivirus )

2. अँटीव्हायरस सुपर क्लीनर ( Antivirus Super Cleaner )

3. अल्फा अँटीव्हायरस क्लीनर ( Alpha Antivirus Cleaner )

4. पावरफुल अँटीव्हायरस क्लीनर ( Powerful Cleaner Antivirus )

5. सेंटर सिक्युरिटी अँटीव्हायरस ( Center Security Antivirus )

6. सेंटर सिक्युरिटी अँटीव्हायरस ( Center Security Antivirus )

सिक्युरिटी रिसर्च कंपनी चेक पॉइंटने आपल्या ब्लॉगमध्ये या ॲप्सची माहिती दिली आहे . या सर्व ॲप्समध्ये शार्कबॉट मालवेअर होते . हे युजर्सच्या फोनमध्ये ‘ ड्रॉपर्स ‘ ( Droppers ) ॲप डाउनलोड करत होते आणि या ॲपद्वारे युजर्सच्या बँक , अकाऊंट तसेच इतर वैयक्तिक माहिती चोरली जात होती .




 


 

Comments are closed

error: Content is protected !!