पुणे,दि. १४ ( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात बुधवार (दि. 13) वूमन सेल मार्फत मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी अभियानाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी ही काळाची गरज आहे. तसेच कॅन्सर सारखा असाध्य रोग प्राथमिक पातळीवर लक्षात आला तर योग्य उपचाराने महिलांचे आरोग्य सुधारता येऊ शकते या दृष्टिकोनातून या तपासण्या वारंवार होणे गरजेचे आहे हे त्यांनी अधोरेखित केले.
या तपासणी अभियानामध्ये 40 वयोगटा पासून पुढील सर्व महिलांना कॅन्सर पूर्व तपासणी विषयी माहिती देण्यात आली त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ब्रेस्ट कॅन्सर पूर्व निदानात्मक तपासणी करण्यात आली
या संपूर्ण तपासणी अभियानात प्रयास संस्था डेक्कन पुणे यांनी सहकार्य केले संस्थेच्या समन्वयक तृप्ती संतोष धारपवार आणि त्यांचे सहकारी योगिनी थोरात, रुपाली गायकवाड, सिद्धी मुळुक, सदाशिव पाटील यांनी मोलाची साथ दिली.
या अभियानात महिला पालक आणि कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला समन्वयक डॉ. रुपाली शेंडकर, डॉ स्वाती शिंदे, डॉ मेघना भोसले, प्रा अक्षता हुंबे आणि विजय मारणे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
Comments are closed