नवी सांगवी ,दि. १४ ( punetoday9news):- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनातून कृष्णा चौक येथे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते, उद्योजक माऊलीशेठ जगताप व सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करूण अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील कामगिरी बद्दल मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ऐश्वर्या गंगावले , सांगवी डिव्हिजन विद्युत विभाग, डी एन जी या डान्स ग्रुप , सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सांगवी,नवी सांगवी,पिंपळे गुरव येथी 125 संयुक्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष विजय गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी उद्योजक माऊली जगताप सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोनपे, नगरसेवक सागर आंघोळकर, अंबरनाथ कांबळे, राजेंद्र राजापुरे, संजय मराठे, सखाराम रेडेकर, बाळासाहेब देवकर, राहुल काकडे, अण्णा तावरे, सुनिल कोकाटे, संदीप दरेकर, राजेश नितनवरे, दयानंद चव्हाण, गणेश बनकर, प्रवीण पाटील, भाऊसाहेब कानकात्रे, ज्ञानेश्वर खैरे, रवी खोकर, रमेश चौधरी, सुदाम मराडे व नागरिक उपस्थित होते.
Comments are closed