इंदापूर  प्रतिनिधी- अभिजीत खामगळ

( punetoday9news):-  इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर मधील आनंदनगर गावातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदाने उत्साही वातावरणात विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. 

कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राजू जाधव व जिवलग बाॅईज यांनी सहकार्य केले.  कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुस्लिम बांधवांच्या हस्ते करून झाली.

यावेळी सोहम जाधव या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पल्लवी कोकरे ,काजल बनसोडे, कुणाल बनसोडे ,जि प शाळा जंक्शन चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बनसोडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व महाराजा गृपचे अध्यक्ष राजू जाधव आणि पुंडलिक सोनवणे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.

त्यावेळी शब्बीर डांगे, सुलतान मुजावर, बाशुद्दिन शेख, ताजुद्दीन शेख, हाजुद्दीन शहरवाले ,गुलाब मुलानी ,उस्मान सय्यद, सागर गेजगे, राकेश कोकरे, विनोद झेंडे, बाळू गायकवाड, बाळू कोळी, महादेव भोसले, पंकज बनसोडे ,जिवलग बाॅईज गृपचे सर्व सदस्य आणि मुस्लिम महिला भगिनी , समाजातील महिला भगिनी उपस्थित होत्या .

कार्यक्रमाचे आभार शब्बीर डांगे यांनी सूत्रसंचालन पुंडलिक सोनवणे यांनी केले .

 

 

 

 




 

 

Comments are closed

error: Content is protected !!