पिंपरी, दि. १६ ( punetoday9news):- पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या दापोडीतील हॅरीस ब्रिज येथे नदीपात्रात पडलेल्या इसमाला वाचवण्यात पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
शुक्रवार ( दि.15) रोजी पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी दापोडी पुल येथे नदीपात्रात एक व्यक्ती नदी पात्रात पडल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार घटनेचे गांभीर्य बघता अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहचले.
मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात उतरून सदर तरूणास सुरक्षितपणे नदीपात्राच्या बाहेर काढले.
या कामगिरी बाबत अग्निशमन दलाच्या जवानांचे परिसरात कौतुक होत आहे.
या बचावकार्यात अग्निशमन दलाचे फायरमन सारंग मंगरूळकर, भूषण येवले, वाहनचालक रुपेश जाधव, वाहनचालक रोकडे, ट्रेनी फायरमन सिद्धेश दरवेश, विकास दाभाडे, सुक्रे, ट्रेनी सब ऑफिसर अभिजित पाटील, सिद्धेश बोडके, चव्हाण सहभागी होते.
Comments are closed