पुणे, दि १७ ( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विधीमहाविद्यालया प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन’ कार्यक्रम महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश अण्णा घुले, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, अॅड. राजेंद्र उमाप उपाध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव ए.एम.जाधव साहेब यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंजना पृथ्वीराज पाटील यांनी केले. यात महाविद्यालयातील परीक्षा विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय अशा विविध विभागांअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश आण्णा घुले यांनी विद्यार्थ्यांना वकिली क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गोष्टी बाबत मार्गदर्शन केले.
अॅड.राजेंद्र उमाप यांनी वकिलीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अद्ययावत राहणे फार गरजेचे असते, तसेच वकिली हा व्यवसाय फक्त पुस्तकी नसून तो एक प्रॅक्टिसचा भाग आहे त्यामुळे विद्यार्थीयांनी ज्युनियर अॅडवोकेट म्हणून इंटर्नशिप करणे गरजेचे आहे, त्यामुळे कोर्टात कशाप्रकारे कामकाज चालते हे लक्षात येते. असे सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एम.जाधव यांनी सर्व पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले व ज्यांना पारितोषिक मिळाली नाहीत त्यांनी नाराज न होता ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ असे समजून आपण पुन्हा एकदा जिद्दीने प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे व सचिव अॅड.संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था नेहमी महाविद्यालयाचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रबिंदू मानून कार्य करते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली मोरे हिने केले तसेच पारितोषिक वितरण प्रा. सनोबर काजी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. माधुरी सरवदे यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठी विविध कमिटीचे प्रमुख, सदस्य तसेच महाविद्यालयातील प्रा. दीपक पाटील, प्रा.संतोष सुतार, वैशाली बहिरट, किशोर इंगळे तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed