सांगवी, दि. १७ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील राहणाऱ्या निवेदिता गायकवाड व राहुल गायकवाड या दाम्पत्यांनी जास्तीचा परतावा व स्वस्तामध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवुन गुंतवणुकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ ते २०२१ या कालावधी हा प्रकार घडला असून आरोपी निवेदिता व राहुल गायकवाड (वय ३७ वर्षे) राहुल गायकवाड ( वय ४० वर्षे) दोघेही , रा . फ्लॅट नं . १ , ग्राऊंड फ्लोअर , ओम रेसिडेन्सी , अभंग कॉलनी , पुणा मार्बल शॉप जवळ , पिंपळे गुरव) यांनी तक्रारदार 1) वंदना बाबासाहेब सुर्यवंशी रा . विद्यानगर पिंपळे गुरव , पुणे , ( १ कोटी ८० लाख रुपये ) २ ) महेश बाबुराव घाटे रा . ओंकार पार्क , साईनाथ नगर सी -७ , थेरगाव पुणे , ( १७ लाख रुपये ) ३ ) ज्ञानेश्वर जगन्नाथ जगताप वय ४५ वर्षे , रा . आनंद पार्क समर्थ बिल्डिंग , पिंपळे गुरव पुणे , ( १ कोटी १० लाख रुपये ) ४ ) स्वाती विजय शिंदे रा . शिवनेरी कॉलनी , पिंपळे गुरव , पुणे , ( २५ लाख रुपये ) ५ ) सोनाली अनिल फाळके , रा . विद्यानगर लेन नं .२ . पिंपळे गुरव , पुणे , ( १५ लाख रुपये ) ६ ) कविता भाऊसाहेब सोनवणे रा . श्रीनगर लेन नं . २ निवृत्ती हाईट्स , पिंपळे गुरव , पुणे , ( १ कोटी रुपये ) ७ ) सिमा संदेश इंगळे रा . अभंग कॉलनी पुना मार्बल गल्ली , पिंपळे गुरव , पुणे ( २० लाख रुपये ) व ८ ) नारायण रघुनाथ चिघळीकर रा . श्री विठ्ठल माऊली बिल्डिंग , स.नं. १३४/२ . गुरुव्दारा चौक , चिंचवड , पुणे ( ९ ५ लाख रुपये ) यांची एकुण ५ कोटी ६२ लाख रुपयांची जास्तीच्या परताव्याचे व स्वस्तामध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवुन फसवणूक केली आहे.
गुंतवणुकीचा परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
सदर फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास श्रीकांत डिसले , सहा . पोलीस आयुक्त करत असून पिंपरी चिंचवड पोलीसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की सदर आरोपी दांपत्यांकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सांगवी पोलीस स्टेशन मो.नं. ८५३०३९७८३२ वर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
Comments are closed