पुणे, दि. २०( punetoday9news):-
लेखक विश्वास देशपांडे यांच्या ‘रामायण : महत्त्व आणि व्यक्तिविशेष’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पत्रकार भवन येथे करण्यात आले. यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, प्रसिद्ध वक्त्या गीता उपासनी, पुस्तकाचे लेखक विश्वास देशपांडे, प्रकाशक सुरेंद्र गोगटे, श्रद्धा देशपांडे, अपर्णा परांजपे आदी उपस्थित होते.
नुकतेच हिंदू नववर्ष, गुढीपाडवा, रामजन्म व हनुमान जन्मोत्सव सोहळा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेले हे पुस्तक महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध वक्त्या गीता उपासनी यांनी सांगितले, की नवीन पिढीला पथदर्शक असे हे अक्षर वाङ्ममय आहे.
सुरेंद्र गोगटे यांनी हे पुस्तक वाचकांना प्रभावित करेल. रामचरित्रावरील पुस्तकातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहील, अशा शब्दात या पुस्तकाबद्दल भावना व्यक्त केल्या.
Comments are closed