● अंकुश शिंदे आता पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त.
● तर संदीप कर्णीक पुण्याचे सह पोलीस आयुक्त.
मुंबई,दि. २०( punetoday9news):- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता गृहखात्याकडून राज्यातील मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . त्यात मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे , नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे , पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा समावेश आहे .
चिंचवडचे धडाकेबाज पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीही बदली झालीय . त्यांच्या जागी आता अंकुश शिंदे हे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत . कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक VIP सुरक्षा , मुंबई इथं बदली करण्यात आली आहे .
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना माळवमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता . त्या घटनेमुळं राज्याचं राजकारण हादरुन गेलं होतं . त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती . त्यानंतर आता कर्णिक यांची पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आली आहे . त्यांच्या जागी सुहास वारके यांच्याकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे .
Comments are closed