पुणे, दि. 21 ( punetoday9news):- पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला जोडून इयत्ता 6 वी ते 12 वी स्वयंअर्थसहाय्यीत मुलींची निवासी शाळा सुरु करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शाळेसाठी 12 एकर गायरान जागेचे वाटपाचे आदेश जारी केले आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रस्तावानुसार खानवडी येथे ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ या स्वयंअर्थसहाय्यीत मुलींच्या निवासी शाळेला शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या शाळेसाठी खानवडी येथे जमीन देण्याची विनंती केली होती. ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्यादृष्टीने जिल्जाधिकारी डॉ.देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला जागा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार खानवडी येथे गायरान जमीन गट क्रमांक 43 मधील 4 हेक्टर 80 आर (12 एकर) जागा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार शाळेला जागा प्रदान करण्यात आली आहे.

 

 




 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!