सांगवी ते शिरगाव चालून नवस पूर्ण.
सांगवी, दि. २२( punetoday9news):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन दीर्घायुष्य लाभावे यासाठी कार्यकर्त्यांनी सांगवी ते शिरगाव चालून नवस पूर्ण केला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असुन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते यांच्याकडून विविध धार्मिक ठिकाणी प्रार्थना केली जात आहे. यातुन आपल्या नेत्याविषयी असणारी प्रचंड आत्मीयता दिसून येते. मतदार संघातील प्रत्येक नागरिक, कार्यकर्त्याच्या सुख दुःखात सहभागी होणारे नेते म्हणूनही भाऊंची ओळख आहे.
अशाच प्रकारे भाऊंचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांनीही भाऊंच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी यासाठी शिरगाव साई देवस्थानचे जयेश मुळे यांच्या कडे साईंच्या चरणी नवस बाबत इच्छा प्रकट करत साईंकडे नवस केला होता.
त्यानुसार भाऊंच्या तब्बेतीत लवकर सुधारणा व्हावी त्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार पायी चालत तुमच्या दर्शनाला शिरगावला येऊ. असे बोलण्यात आले होते.
सद्यस्थितीत भाऊंच्या प्रकृती मध्ये खुप चांगली सुधारणा झाल्यामुळे केलेला नवस पूर्ण करण्यासाठी सर्व मित्र परिवार मिळून २१ एप्रिल रोजी सांगवी ते शिरगाव साईंच्या नावाचा जयघोष करत साईंच्या दर्शनाला चालत गेले.
त्यावेळी संजय मराठे, अनिल कांबळे, किशोर मिसाळ, सुरज बाबर,राम पुंडे, माऊली घोलप, राजु आवळेकर, शैलेश थोरात, जॉन गायकवाड, कृष्णा शिंदे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed