● प्रा. सुधाकर सुतार यांच्या सेवापूर्ती समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांचे प्रतिपादन.

पुणे, दि. २३ ( punetoday9news):-  उपक्रमशील शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. प्रा. सुधाकर सुतार यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी केले.

( फोटो : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रा. सुधाकर सुतार यांचा सेवापुर्ती निमित्त सन्मान करताना संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे. )

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे पूर्णवेळ शिक्षक (प्रात्यक्षिक) यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून राजेंद्र घाडगे बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे येथील सहसंचालक चंद्रकांत निनाळे होते. याप्रसंगी बोलताना चंद्रकांत निनाळे म्हणाले की व्यवसाय अभ्यासक्रम व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अनेक प्राध्यापक विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतात व त्यामधून अनेक व्यावसायिक व उद्योजक निर्माण झाले आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखांमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रभावीपणे प्रशिक्षण देत असताना शिक्षक ऑन द जॉब ट्रेनिंग, सर्विस सेंटर, औद्योगिक भेटी, विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे प्रकल्प तयार करून घेणे, उद्योजकता शिबिर असे उपक्रम राबवतात व व्यवसाय शिक्षणाचा उद्देश सफल करतात. त्यामुळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागांमध्ये प्रशिक्षण देणारे अनेक उपक्रमशील हिरे आहेत त्यातीलच एक हिरा प्रा. सुधाकर सुतार असल्याचे गौरवोद्गारही याप्रसंगी निनाळे यांनी काढले. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी याप्रसंगी बोलताना प्रा. सुतार यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य एस.डी. शिंदे, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. अरुण शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख संजय भोईटे तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या विविध शाखांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्रा. सुधाकर सुतार यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रा.अरुण शिंदे, प्रा.सुरेश मोरे, प्रा. हेमंत सावंत, प्रा. एन.बी.मुल्ला, प्रा.राधिका इप्पकायल, सुरेखा वीर, रमेश भिलारे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अरुण शिंदे यांनी केले. प्रा.नीता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. हेमंत सावंत यांनी आभार मानले.

 






 

Comments are closed

error: Content is protected !!