पिंपळे गुरव, दि. २३( punetoday9news):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची मागील काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांची संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हाकेला धावून येणारा नेता, कार्यकर्त्याच्या सुख दुःखात सहभागी होवून प्रत्येकाची समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर अशी ओळख आहे. मात्र त्यांनाच रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने सर्व कार्यकर्त्यांकडून विविध धार्मिक ठिकाणी प्रार्थना केली जात आहे.
आमदार लक्ष्मण(भाऊ) जगताप महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार आहे की त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांशी मंदिरांमध्ये प्रार्थना केली आहे.
आज सकाळी ८ ते ९ या वेळात पिंपळे गुरव येथील नवीन प्राथमिक शाळेत लोणावळा मन:शक्ति केंद्रा तर्फे ह.भ.प.मधुकर संधान सर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दिर्घायुष्यासाठी व प्रकृती स्वास्थ्यासाठी गायत्री मंत्राचा जप करुन प्रार्थना करण्यात आली. तसेच भगवत गीतेतील काही श्लोकांचे पठण करण्यात आले.
रमेश काशीद यांनी कुटुंबासमवेत शनिशिंगणापूर येथे जाऊन शनि देवाची पूजा केली तर मारुती तरटे यांनी पाषाणच्या सोमेश्वर मंदिरात भाऊंच्या दीर्घ आयुष्यसाठी प्रार्थना केली.
आदरणीय लक्ष्मणभाऊ लवकरच पूर्णपणे बरे होतील व त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजात सहभागी होतील हा सर्व मन:शक्तीच्या साधकांचा दृढ विश्वास आहे असे त्याप्रसंगी विजू अण्णा जगताप (अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड) म्हणाले.
Comments are closed